सोलापूर - अवैध धंदा चालकांकडून ‘पोलीस कर्तव्य टॅक्स’ घेवून पोलिसांनी मटका व जुगार सारख्या अवैध धंद्याना कायदेशीर परवानगी द्यावी, म्हणून उद्या दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना समक्ष भेटून विडंबनात्मक निवेदन देणार असल्याची माहिती ॲड. योगेश (दत्ता) पवारप्र, देश उपाध्यक्ष - राष्ट्रीय छावा संघटना, महाराष्ट्र. मा, हिती अधिकार कार्यकर्ता, महाराष्ट्र राज्य.सू, चना प्रदाता (व्हिसल ब्लोअर), महाराष्ट्र यांनी दिली.
मटका धंद्याला कायदेशीर परवानगी द्या, म्हणणे थोडेसे हास्यास्पद वाटेल. परंतु, सद्यस्थितीत सोलापूरसाठी ते अत्यंत गरजेचे आहे. कारण सोलापुरात काही पोलिसांच्या कृपाशीर्वादाने अवैध मटका व जुगार धंदे इतके यशस्वी व लोकप्रिय झाले आहेत की, त्या धंद्याना अवैध म्हणणे म्हणजे मटका धंद्याच्या महान परंपरेचा अपमान ठरून, लोकांच्या भावनांशी खेळणे ठरेल. त्यामुळे या अवैध धंद्यांना कायदेशीर मान्यता देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच, या धंद्यांना कायदेशीर परवानगी देऊन त्या धंदा चालकांचा गौरव करावा, यासाठी उद्या निवेदन देणार आहे.
त्या निवेदनावर पोलीस प्रशासनाने 21 दिवसांत कार्यवाही नाही केल्यास दिनांक 28 एप्रिल 2025 पासून ते दिनांक 01 मे 2025 पर्यंत पूनम गेट, जिल्हा परिषद, सोलापूर येथे खालील प्रमाणे सविनय कायदेभंग पद्धतीने मी स्वत: आंदोलन करणार आहे.
दिनांक 28 एप्रिल 2025 ते दिनांक 01 मे 2025 या कालावधीतील दिवस निहाय आंदोलन पुढीलप्रमाणे आहे
दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता अवैध धंद्याच्या परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रतेची माहिती जाहीर करून अवैध मटका धंद्याला परवानगी देणारे मदत कक्ष उघडणार आहे.
दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता मटका चालकांना 'उद्योग रत्न' पुरस्कार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या हद्दीनिहाय मटका व्यवसायकांची नावे जाहीर करणार आहे.
दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता वसुलदारांना 'कर्तव्य दक्षता' पुरस्कार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या हद्दीनिहाय वसुलदारांची नावे जाहीर करणार आहे.
दिनांक 01 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजले पासून ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत मटका व्यवसायाचे उद्घाटन करून मोठया पडद्याच्या स्क्रिनवर सोलापुरातील सुप्रसिद्ध मटका धंद्याचे विडिओ व वसुलदारांचे विडिओ दाखविणार आहे.
No comments:
Post a Comment