सोलापूर - सोलापूर स्मार्ट सिटी व महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या पार्क स्टेडियम, लाईट अँड साउंड शो, लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर तलाव सुधारणा, अँडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बाजार, या ठिकाणी आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या सह अधिकारी उपस्थिती होते.
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान) येथे पहिल्या टप्प्यात मैदानावरील 11 मुख्य (पीच) खेळपट्टया तसेच 6 सराव खेळपट्टया (पिच) तयार करण्यात आले असून या ठिकाणी पॅव्हेलियन इमारत, पंचकक्ष, व्ही.आय.पी कक्ष आणि माध्यम कक्ष उपलब्ध आहे.
स्मार्ट सिटी च्या माध्यमातून सिद्धेश्वर तलाव शहरातील सिध्देश्वर तलाव परिसरात नागरिकांकरीता संगीताच्या तालावर व कारंज्यावर आधारित लाईट अँड साऊंड शो, लक्ष्मी मार्केट हेरिटेज स्ट्रक्चरचा पुनरुज्जीवन १०० वर्षापूर्वीचे लक्ष्मी मार्केट नुतनीकरण करणेच डिझाईन तयार करणेत आलेले आहे. त्याठिकाणी १००० ओटे व मसाला विक्री करण्याकरिता १०० गाळे बांधण्यात त्याची माहिती तसेच श्री सिद्धेश्वर तलाव सुधारणा सिध्देश्वर तलावाचे पुर्नज्जीवन करणे सदर प्रकल्पाअंतर्गत सिध्देश्वर तलावाची स्वच्छता व साफसफाई, तलावाच्या सभोवताली वाकिंग ट्राक, सुशोभीकरणकरणे इत्यादी कामे पासपोर्ट ऑफीस लगत याठिकाणी अँडव्हेंचर पार्क करणेत आलेले आहे.
त्या ठिकाणी प्रवेशद्वार, रेस्टॉरंट, नर्सरी लहान मुलांकरीता खेळण्याची साधने इत्यादी चीं माहिती स्ट्रीट बाजार या प्रकल्पा अंतर्गत रस्ते ड्रेनेजचा विकास स्ट्रॉम वॉटर लाईन, फुटपाथ व इलेक्ट्रीक काम इत्यादी कामे करण्यात आलेले त्या संदर्भातील माहिती घेतली.
No comments:
Post a Comment