आयपीएल फॅन पार्क सोलापुरात शासकीय मैदानावर... लकी ड्राद्वारे मिळणार टी शर्ट - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, April 18, 2025

आयपीएल फॅन पार्क सोलापुरात शासकीय मैदानावर... लकी ड्राद्वारे मिळणार टी शर्ट

 

 



सोलापूर - आयपीएलचा हंगामातील चार सामने पाहण्याचा लाभ सोलापूरकराना मिळणार असून शनिवारी व रविवारी नेहरूनगर शासकीय मैदानावर यासाठी १८ बाय ३२ फुटाची स्क्रीन लावण्यात आली आहे.





आयपीएल  फॅन पार्क सोलापुरात सातव्यांदा होत असल्याची माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी अमित सिद्धेश्वर यांनी दिली. मागील वर्षी  सोलापुरात झालेल्या आयपीएल फॅन  पार्क मध्ये 14 हजार प्रेक्षकानी हजेरी लावल्यामुळे यंदा परत सोलापूरला हा मान मिळाला आहे.  या फॅन पार्कमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. या फॅन पार्कमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक गेम असून फूड स्टॉल ही आहेत.  प्रेक्षकातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. चार सामन्यातून चार टी-शर्ट लकी ड्रॉ विजेत्यास मिळणार आहेत.  त्या टी-शर्ट वर आयपीएल मधील त्या खेळाडूची सही असणार आहे.





चारही सामने प्रेक्षकांना पाहण्यास निशुल्क असून प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सो  यांनी केले आहे. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश भूतडा, खजिनदार संतोष बडवे, अप्पू गोटे, ऋत्विक चव्हाण व सुनील मालप आदी उपस्थित होते.





असे होणार सामने

शनिवार : गुजरात विरुद्ध दिल्ली

राजस्थान विरुद्ध लखनऊ

रविवार : पंजाब विरुद्ध बंगलुरु

मुंबई विरुद्ध चेन्नई

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot