सोलापूर - जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्यामुळे वळसंग च्या ग्रामस्थांची तहान ऐन उन्हाळ्यात भागली आहे. सिईओ यांनी पुढाकार घेतलेले वळसंग चा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. कुरनूर धरणातून उचल पाणी असलेमुळे ग्रामस्थांनी पाणी शुध्द करून पिण्याचे आवाहन सिईओ कुलदीप जंगम यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन कामाची पाहणी केली. या प्रसंगी उप अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उप अभियंता सुनील देशपांडे , कनिष्ठ अभियंता गोरे, सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, सदस्य मलकप्पा कोडले, श्रीशैल भुसणगी,ग्रामसेवक राजकुमार जाधव, तसेच ग्रामस्थ सिद्धाराम वाघमारे, मोसीन फुलारी, सिद्धय्या मठपती व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
वळसंग येथे जलजीवन मिशन अंतर्गत कुरनूर येथील धरणातून पाणी वळसंग येथे आणण्यात येत आहे. या साठी ग्रामपंचायतीस अनंत अडचणींचा सामना करावा लागला.
कुरनूर धरणातून वळसंग येथे पाणी आणण्यासाठी काम सुरूवात होते परंतु कुरनूर धरणाजवळ इलेक्ट्रिशन पंप साठी वीज कनेक्शन ची सुविधा नसल्यामुळे एमएसईबी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व उपजिल्हाधिकारी सुमंत शिंदे यांच्यासमोर विजमंडळा चे अधिकारी यांचे समवेत बैठक घेऊन चर्चा केली. कुरनूर येथे वीज मंडळाने विद्युत पुरवठा तातडीने करून काम पुर्ण केले.
मात्र कुरनूर ते वळसंग या मार्गावर तीर्थ येथे काही शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना रोखली होती. संबंधित शेतकरी सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासमोर झाली या सुनावणीत कुणीही पाणीपुरवठा योजना अडवणार नाही याबाबत शेतकऱ्यांचे समुपदेशन मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी केले. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत होऊन पाणी वळसंग येथे आणण्यासाठी मदत झाली आहे.
सिईओ यांनी सुचविला थेट पर्याय..!
वळसंग येथे पाण्याचा मोठा संघर्ष ग्रामस्थांना करावा लागत आहे. सिईओ कुलदीप जंगम यांनी कुरनूर धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रा पर्यंत आणण्या बरोबरच ते पाणी सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे विहीरी जवळ आणून तिथून थेट पाणी पुरवठा गावात करणेचे सुचना दिले.या मुळे वळसंगचा पाणी प्रश्न मार्गी लागणेस मदत झाली आहे. प्राधिकरण विभागाने तातडीने पाणी पुरवठा
योजना पुर्ण करणेते सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment