सोलापूर - जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष यांनी तातडीने पदभार घ्यावा किंवा शासनाच्या वतीने परत एकदा मुदतवाढ द्यावी. अशी मागणी सामाजिक व न्याय मंत्री संजय शिरसाट यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन व ईमेल द्वारे करण्यात आली.
सोलापूर सह अनेक जिल्ह्यात जात पडताळणी समिती कार्यालयकडे हजारो अर्ज प्रलंबित होते त्यामुळे शासनाच्या वतीने गेल्या महिन्यांमध्ये सर्व जिल्ह्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयासाठी अध्यक्ष नेमण्यात आले होते .तथापि सोलापूर जिल्ह्यासाठी महिना होत आला तरी पूर्णवेळ अध्यक्ष रुजू झाले नसल्यामुळे अजूनही अनेक जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे काम प्रलंबित आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी जात पडताळणी अध्यक्ष तात्काळ मिळणे बाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राची मुदत वाढवून मिळावी अन्यथा विद्यार्थ्यांचे जर शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, सुनिता घंटे राजनंदिनी धुमाळ ,जयश्री पाटील ,कार्याध्यक्ष अरविंद शेळके, रमेश भंडारे ,रमेश चव्हाण, वैभव धुमाळ ,दिलीप निंबाळकर ,शेखर कंटेकर, सतीश वावरे ,अभिषेक जहागीरदार, सिद्धाराम सवळे आदी उपस्थित होते.
उदाहरण - अंजली अमोल ताकमोगे हिने कुणबी दाखल्यावरून वंदना एन. तासगावकर आयुर्वेद महाविद्यालय, चंदाई, पो.नसरापूर, ता.कर्जत, जि.रायगड या आयुर्वेद महाविद्यालयातील बी.ए.एम.एस. साठी 2024 मध्ये प्रवेश घेतला आहे. स्कॉलरशिप मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मार्च आहे. कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे अंजली ताकमोगे या विद्यार्थीनी स्कॉलरशिप साठी पात्र होता येत नाही. तीला स्कॉलरशिप न मिळाल्यास 30 मार्च नंतर जवळपास पावणेदोन लाख रूपये फी कॉलेजला भरावी लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यासाठी अंजली अमोल ताकमोगे हिने जुन 2024 मध्ये सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारीजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर यांच्याकडे अर्ज केलेला आहे. त्यावर अजून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कुणबी दाखला मिळूनही कास्ट व्हॅलिडिटी 30 मार्चपर्यंत न मिळाल्यास अंजलीला पावणेदोन लाख रूपये फी कॉलेजला भरावी लागणार आहे. संबंधित कॉलेजकडून अंजली ताकमोगे हिला 25 मार्च पर्यंत कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजला सबमीट करावी अशी सुचना केली आहे. अंजलीच्या वडिलांचे निधन झाले असून भाऊ लहान आहे.तिची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे या संदर्भात गांभीर्याने विचार व्हावा.
No comments:
Post a Comment