सोलापूर - श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष पदी संदीप महाले, कार्याध्यक्ष पदी बंटी क्षीरसागर तर प्रसिद्धी रोहन श्रीराम यांची निवड करण्यात आले.
श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समिती 2025-26 उत्सव अध्यक्ष पदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्याध्यक्ष पदी बाबुराव क्षीरसागर, सचिव पदी नागेश मंजेली, सहसचिव पदी सिकंदर कतारी, प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम, मीरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख पदी ओंकार होमकर, उत्सव उपाध्यक्ष पदी अनिल अंजनालकर, अर्जुन शिरकुल, माधवी अंधे, विराज अलकुंटे यांची नियुक्ती पत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे. हिंदू धर्म जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामचंद्र जयंती साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म, अर्थ,काम, मोक्ष, मिळण्याकरिता श्रीराम जयंतीच्या एक दिवस अगोदर होम हवन यज्ञ करण्यात येणार असल्याचे पंडित वेणुगोपाल जिल्ला यांनी सांगितले.
यावेळी नूतन सर्व पदाधिकाऱ्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी देऊन मार्गदर्शन केलं.
याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्ला पांतलू, संजय होमकर, संजय साळुंखे, अक्षय अंजिखाने, सुधीर बहिरवाडे, गणेश चिंचोळी, भिमाशंकर पदमगोंडा, सागर अतनुरे, यतीराज होनमाने, शिवराज गायकवाड, सतिष पारेली, अर्जुन मोहिते, विश्वनाथ प्याटी, भिमाशंकर जमादार, बिपिन पाटील, विजय कुलथे, लक्ष्मण सरवदे, केतन अंजिखाने, नरेश ताटी, अमर गट्टी, विठ्ठल सरवदे मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment