सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथील ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील छावा हे चित्रपट प्रदर्शित झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावरील छावा हे चित्रपट महाराष्ट्रातील नवयुवकांमध्ये एक महाराजांचे विचार आचरणात आणणारे एक नवी क्रेझ निर्माण केली आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित छावा हे चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात आणि परदेशात प्रदर्शित झाला आहे.
दरम्यान शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकांचे युवा नेते पार्थ पवार यांचे तुलाभार करून डोक्यावर अजितदादांचा छावा असे नमूद असणारे फेटा, छत्रपती संभाजी महाराज यांचे इंग्रजी भाषेतील रूपांतरित पुस्तक,शाल आणि भला मोठा पुष्पहार घालून किसन जाधव यांनी त्यांचा सत्कार केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी खासदार सौ सुनेत्रा वहिनी अजित पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुरेश पालवे, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार,उदय माने, मोहित नायडू,सोलापूर राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप, राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे राष्ट्रवादी शहर संघटक हुलगप्पा शासम,शहर संघटक ऋषी येवले, लखन जाधव मुंबई,दीपक आरगेल, महादेव राठोड, आनंद गावडे, यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment