सोलापूर: सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची आज सोलापूर महानगरपालिका त्यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी शिष्टमंडळासह सोलापूर शहरातल्या विविध विषयासंदर्भात शुक्रवारी आयुक्तांची भेट घेतली.
1) सोलापूर महानगरपालिका रोजंदारी बदली कामगार यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तातडीने नगर विकास विभागाकडे पाठवण्याबाबत
2) बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरामधील स्वच्छतागृह बांधण्याबाबत
3) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने विविध कामाबाबत
4) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विकासाची कामे तातडीने हाती घेण्याबाबत
5) सोलापूर शहरातील रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत वंचित लाभार्थ्यांसाठी तातडीने आवास मंजूर करण्याबाबत...
6) जुना कारंबा नाका ते सम्राट चौक नव्याने रस्ता करण्याबाबत
7) सोलापूर महानगरपालिका अंतर्गत लाड कमिटी योजना प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबवणे व त्या संबंधाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याबाबत .
वरील विषयाच्या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन वरील सर्व विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली सदरचे विषय तातडीने माहिती घेण्याबाबत आयुक्ताने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले .
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पवार, नगर अभियंता सारिका आकुलवार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते . तसेच बैठकीस नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, चंद्रकांत उर्फ चाचा सोनवणे, अविनाश भडकुंबे, धीरज वाघमोडे, अजय इंगळे, आदित्य साबळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment