सोलापूर - महापालिका आयुक्त ओंबासे हे नवीन पदभार स्वीकारल्यानंतर बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमाई आवास ही कशा पद्धतीने रखडली आहे व लवकरात लवकर विषय मार्गी लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
आयुक्त यांनी दिनांक 20 मार्च रोजी बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यासमवेत आज दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते रमाई आवास योजनेचे प्रकरणासंदर्भात वेगवेगळे नियम व अटी तयार करून जाणून-बुजून योजना प्रलंबित ठेवण्यात आली होती त्या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभ्यासपूर्वक मांडणी करून आयुक्त यांना मुद्दे समजावून सांगण्यात आले त्यानुसार रमाई आवास योजनेसाठी असलेले 269 स्क्वेअर फुट ची मर्यादा ही खालीवर बांधकाम करून पूर्ण करा अशी मागणी करण्यात आली.
खाजगी झोपडपट्टी यांना सुद्धा सदर योजनेमध्ये लाभ देण्यात यावा व घोषित व अघोषित झोपडपट्टीमधील प्रकरणे सुद्धा तात्काळ मार्गी लावा या संदर्भात बैठकीमध्ये अगदी सकारात्मक चर्चा करण्यात आली. सन्माननीय आयुक्त यांनी सर्व विषय हे समजून घेतले व संबंधित अधिकाऱ्यांना योजना मार्गी लावण्या संदर्भात सूचना केली आहे बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमुळे रमाई आवास योजना यापुढे मार्गे लागणार आहे असंच सोलापूरच्या विविध प्रश्न संदर्भात बहुजन समाज पार्टी ही मैदानात राहून काम करेल.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, शहराध्यक्ष देवा उघडे, प्रवीण कांबळे आणि अमर साळवे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment