सोलापूर - मराठा सेवा संघ महाराष्ट्र आयोजित मराठा जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण राज्यात जिजाऊ रथ यात्रेचे आयोजन केले आहे. संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक १८ मार्च शहाजी महाराज यांचे जन्म दिनी वेरूळ गढी येथून रथ यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला, ४५ दिवसांच्या प्रवासानंतर पुणे येथील लाल महलात रथ यात्रेची सांगता होईल. रथयात्रे सोबत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव तनपुरे यांचेसह केंद्रीय पदाधिकारी आहेत. अशी माहिती विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात दिनांक २३ रोजी सांगोला येथे रथयात्रेचे आगमन व स्वागत होईल मिरवणुकीनंतर पंढरपूरला मुक्काम होईल. पुढे अकलूज टेंभुर्णी मार्गे येऊन कुडूवाडीला मुक्काम. दिनांक २५ मार्चला कुदुवाडी, माढा, अनगर, मोहोळ मार्गे मंगळवारी सायं ५.३० वाजता सोलापूर शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात जिजाऊ रथ यात्रेचे भव्य स्वागत होईल. सोलापूर शहरातील सर्व सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर स्वागतासह मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत. स्वागता नंतर अनेकविध पथकांच्या सोबत वाद्यासह रथयात्रा मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन व पूजन करून चार हुतात्मा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन होईल. ७.०० वाजता नंतर चार हुतात्मा चौकात शाहीर पोवाडे चा कार्यक्रम व त्यानंतर त्याच ठिकाणी मार्गदर्शनपर सभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. शिवश्री डॉ.जी. के. देशमुख यांनी दिली.
सध्या समाजात एकमेकात असणारा संवाद, समन्वय, ओलावा कमी होताना दिसत आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी संभ्रम दूर व्हावा. धार्मिक, जातीय व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी संपूर्ण समाजाला "चला पुन्हा एकदा एक होऊन सर्व शक्तिमान होऊया, वाद मिटवून संवाद साधूया " अशी एकत्र येण्याची हाक दिली आहे. म्हणून जिजाऊ शिवरायांचा एकीचा व नेकीचा संदेश घेऊन ही जिजाऊ रथ यात्रा मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी सायं ५.३० वाजता सोलापूर शहरात येत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन आणि जिजाऊ शिवरायांचे विचार घेण्यासाठी सोलापुरातील सर्व समाजातील बांधव व भगिनींनी बहुसंख्येने रथयात्रेमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन शहराध्यक्ष शिवश्री सूर्यकांत पाटील यांनी केले.
रथ यात्रेच्या नियोजनासाठी समन्वयक दत्तामामा मुळे, उपाध्यक्ष बब्रुवाहन माने- देशमुख,, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोमनाथ राऊत, उपाध्यक्ष सदाशिव पवार,, सेक्रेटरी लक्ष्मण महाडिक, केंद्रीय सदस्य विश्वनाथ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे, मराठी सेवा संघाचे आर. पी. पाटील, राम माने, दीपक शेळके आदी मराठा सेवा संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत
No comments:
Post a Comment