संभाजी ब्रिगेडच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, March 23, 2025

संभाजी ब्रिगेडच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

 




सोलापूर - संभाजी ब्रिगेड च्या वतीने पवित्र रमजान निमित्त राष्ट्रीय एकोपा जपण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील सावंतवाडी येथील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संपर्क कार्यालयात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.





 मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्तानं होणारी 'इफ्तार पार्टी' म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे.  देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावून त्यांना दंगली करण्यासाठी प्रवृत्त केलं जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, आपण आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवलं पाहिजे," शिक्षणावर भर दिला पाहिजे असे मनोगत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी उपस्थितीना केले.






संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते ग्रामीण भागात ही हिंदू मुस्लिम एकोप्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करणे गरजेचे होते त्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमान दारफळ अकोले काठी कोंडी या परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.






यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ संपर्कप्रमुख छत्र गुण माने कार्याध्यक्ष अरविंद शेळके मौलाना बुगन इनामदार शहाजहान इनामदार रफिक इनामदार सुजातखा पठाण चांद इनामदार जिलानी मुलानी शाहिद मुलांनी तनिज मुकाजी अझर मुलांनी सलीम शेख नासिर इनामदार, सुनिता घंटे राजनंदिनी धुमाळ ,जयश्री जाधव रमेश भंडारे ,रमेश चव्हाण, गोवर्धन गुंड वैभव धुमाळ ,दिलीप निंबाळकर ,शेखर कंटेकर, सतीश वावरे ,अभिषेक जहागीरदार, सिद्धाराम सवळे अमोल सावंत विकास सावंत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot