सोलापूर - ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व एमआयटी रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त एमआयटी कॉलेज मधील हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी एमआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मधुकर लेंगरे, बार्शी पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख, व्यसनमुक्ती केंद्र संचालिका डॉ. पल्लवी तांबारे, स्त्री रोग तज्ञ डॉ.गौरी गायकवाड, दंत शैल्य चिकित्सक डॉ. समिता गरुडे, व संस्थेच्या प्रमुख सदस्य कोमल राहुल वाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले प्रथम क्रांतीज्योती भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोनिका सोनवणे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रगती वाणी यांनी करून दिला एम आय टी रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज माहिती महेश केवडकर सर यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिलांच्या सन्मान प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये ऍड. वंदना जगनाडे, भूमी उप अधीक्षक रेश्मा तांबारे, केंद्रीय मुख्याध्यापिका चित्रा उकिरडे, प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण, महिला हेड कॉन्स्टेबल आरती कसबे, डॉ. रोहिणी मुल्ला, महसूल सहाय्यक स्मिता कोल्हे, लोकमंगल बँक व्यवस्थापक वर्षा शिंदे, ऍड. वंदना चंदनशिवे, कनिष्ठ सहाय्यक शितल गिराम, वीर प्रथम गौडगाव रोहिणी काकडे, आदर्श महिला गीता भोजने, आरोग्य सेविका स्वप्नाली उकिरडे, बार्शी महिला पोलीस रेश्मा सुतार, परिचारिक डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल जयश्री मानूरकर, आदर्श माता प्रतिभा नलवडे, महावितरण ऑपरेटर मोनिका जाधव /आटकळे, सफाई कर्मचारी बार्शी नगरपरिषद अनिता साठे, वाहक एस टी डेपो करुणा शिवशरण, कृषी समिती अनुराधा इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पाच बचत महिला गटांचाही सन्मान करण्यात आला त्यामध्ये सखी बचत गट बार्शी अध्यक्षा अश्विनी शेलार ध्यास महिला पतसंस्था बार्शी अध्यक्ष रचना पाटील, वीरभद्र उत्पादक महिला बचत गट बार्शी अध्यक्षा आशादेवी स्वामी, आशाताई महिला स्व सहाय्यता महिला बचत गट बार्शी , अध्यक्षा सौ रेखा विधाते, निसर्ग महिला उत्पादित गट सासुरे अध्यक्षा वैशाली आवारे या बचत गटातील सर्व महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सिंधुताई देशमुख, डॉ.रेश्मा तांबारे, डॉ.गौरी गायकवाड त्यांची मनोगती झाली कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्रा. डॉ. मधुकर लेंगरे सर यांनी ओन्ली समाजसेवा संस्थेचा गुणगौरव करून केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेच्या प्रमुख सदस्य प्रा. माधुरी शिंदे मॅडम व शितल उलभगत मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले सत्कारला उत्तर एड.वंदना जगनाडे यांनी दिले सर्वांचे आभार संस्थेच्या प्रमुख सायरा मुल्ला मॅडम यांनी मानले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची नाश्त्याची सोय केली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी व सचिव विजयकुमार दिवाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य महिला सदस्य यांनी परिश्रम घेतले असे प्रतिनिधीशी बोलताना अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले
No comments:
Post a Comment