संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने ध्वजारोहण - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, May 1, 2025

संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने ध्वजारोहण

 



सोलापूर - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जाते महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्रवीरांना आदरांजली अर्पण करत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत राष्ट्रवादीच्या वतीने  राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 




महाराष्ट्र गौरव गीत  झेंडावंदन गीत आणि राष्ट्रगीताने सेवादलच्या वतीने सलामी देण्यात आली या ध्वजारोहणाचे संचलन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले..


 


याप्रसंगी शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर ,युवती अध्यक्ष किरण माशाळकर ,अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख ,कार्याध्यक्ष संजय मोरे ,सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी ,OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद ,कार्याध्यक्ष आयुब शेख, VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले ,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी ,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख ,युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे ,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे ,सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे ,दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ,कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर ,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड,शहर सरचिटणीस श्यामराव गांगर्डे ,सचिन घोडके, अर्चना दुलंगे ,सुरेखा घाडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या  एकजूटीच्या बळावर आपण महाराष्ट्राला अधिक वेगानं प्रगतीच्या वाटेवर नेऊया, असा दृढ संकल्प करूया. आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या तसंच जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो- संतोष पवार जिल्हाध्यक्ष 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot