नागरी समस्यांसंदर्भात विभागीय कार्यालयात आंदोलन - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, April 30, 2025

नागरी समस्यांसंदर्भात विभागीय कार्यालयात आंदोलन



सोलापूर - सोलापूर शहरात विकास काम संथगतीने सुरु असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत. यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले. 

            




विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे, विभागीय कार्यालयाचे सौ. सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले. शहरात पाणीपुरवठा 5 दिवसाआड होत असताना घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, इंदिरा वसाहत, सोना नगर, मुनाळे बोळ, गणेश नगर, दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणीपुरवठा येत आहे. तर काही ठिकाणी पिवळसर पाणीपुरवठा होत आहे.या संबंधित अनेकवेळा तक्रारी देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोडभावी पेठ परिसरातील स्मार्ट सिटी भागात रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहत असतात. फुटपाथ धुवणे, गाडी धुवणे असे प्रकार सरार्स होत असून पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात यावे. 






या भागात अनेकांच्या घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये ड्रेनेज भरत असून मॅन होल मध्ये गाळ साचले असून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. विभागीय कार्यालयाच्या वतीने वारंवार सांगुनही साफ सफाई होत नाही. यासह ब्रिटिशकालीन पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाईन गंजलेले व कुजलेले असून त्याची पाहणी करून पाणी व ड्रेनेज लाईन बदलून घ्यावे. रस्त्यावरील लाईट वारंवार बंद पडत आहेत. प्रभाग 3 मध्ये नवीन रस्ते करताना काही भागात अंडरग्राउंड केबल टाकल्याची खात्री करूनच रस्ते करावे. मानवी नगर हैनाळकर पट्टा या भागात दिड वर्षापूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते. त्या भागात निकृष्ट दर्जेचे काम झाल्याने ड्रेनेज व पेव्हर ब्लॉक खराब झाले आहे. सदर काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून पुनःच काम करून द्यावे. 






प्रभागात झाडूवाले व बिगारी यांचे जागा रिक्त असल्याने प्रभागात कचरा गोळा आहे परंतु मनुष्यबळ कमी असल्याने त्वरित जागा भरण्यात यावे. नागरिकांच्या घरोघरी घन्टागाडी जात नाही. काही भागात 2 दिवसाआड कचरा उचलला जात नसल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी मांडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी धाकटा राजवाडा ते रूपाभवानी मंदिर रोड पर्यंत नाला साफसफाई करण्यात यावे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये गरीब नागरिक असून त्यांच्या करिता आरोग्य वर्धिनी उभारण्यात यावे. असे एक ना अनेक तक्रारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यापुढे मांडण्यात आले. विभागीय कार्यालयातील अनेक जागा रिक्त असून पालिकेच्या वतीने सर्व जागा भरून प्रभागाच्या समस्या सोडवण्यात यावे अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केले. 






यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी 8 दिवसांत सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संदीप महाले, रवी गड्डम, प्रशांत कलशेट्टी,  शरणु मुडल, माऊली जांभळे, भारत माने, राहुल कांबळे, सिद्राम दासरी, सिद्दु गंधाळकर, रसोलगीकर, प्रथमेश गुल्लापल्ली आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot