सोलापूर - 30 एप्रिल 2025 हा दिवस राज्यात गोमय उत्पादन विक्री दिवस साजरा करावयाचा आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय मुल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचलित कट्टेव्वादेवी गोशाळेचे गोमय उत्पादन विक्री स्टॉलचे उद्घाटन समारंभ मा. आमदार सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी केतनभाई शहा (भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष), गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार, रुद्रप्पा बिराजदार, केमचे श्री परमेश्वर तळेकर ,येवले, (सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त) ह.भ.प. अभिमन्यू डोंगरे महाराज जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद, सोलापूर.) महेश भंडारी, (अध्यक्ष, सोलापूर गोसेवा महासंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी गोभक्त, गोसेवक, गोरक्षक उपस्थित राहून गोमातेच्या गोशाळांनी सहभाग नोंदवला नजीकच्या एसटी बस स्थानकावर दिनांक 30.04.2025 रोजी पूर्ण दिवसभर त्यांच्याकडील गोमय उत्पादनाचा (स्टॉल) लावायचा आहे. त्याची प्रसिद्धी व विक्री करून उत्पादने किती चांगली आहे याबाबत स्थानकावर आलेल्या प्रवाश्यांना सविस्तर माहिती द्यावयाची आहे. सदर बाब केल्याने गोमय उत्पादनांची उत्कृष्ट अशी प्रसिद्धी होईल व गोशाळेला अर्थाजन होण्यास मदत होईल व त्या मुळे भाकड गोवंश हे कत्तलखान्या मध्ये जाणार नाहीत,तसेच शेतकरी सुद्धा आपले गोवंश हे कसाईना विकणार नाही,,
No comments:
Post a Comment