सोलापूर - १ मे कामगार दिनाचे अवचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते सोलापूर शहरातील कष्टकरी असंघटित बांधकाम कामगार यांचा फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मोदी येथे आनंदी वातावरणात संपन्न झाला.
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शहर सरचिटणीस कुमार जंगडेकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, OBC सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड , तर सचिव दत्तात्रय बनसोडे यांची उपस्थिती होती.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपस्थित कामगार वर्गास शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे शहराध्यक्ष मार्तंड शिंगारे व कार्याध्यक्ष संजय सांगळे यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पल्लारे, गोपाळ आरगोट,अशोक गोविंद्लू,सोमनाथ साखरे , श्रीकांत टोणपे यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment