सोलापूर - संयुक्त महाराष्ट्राच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी सहकार औद्योगिक क्रांतीची यशवंत हरित ज्योत पुसद नांदेड येथून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. तेथून ही यात्रा बाबळगाव , निलंगा सांगली, प्रीतीसंगम शक्ती स्थळ यशवंतराव चव्हाण समाधी कराड ते हुतात्मा चौक मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या हस्ते ज्योत समारोप होणार आहे . या यशवंत हरित ज्योतचे प्रज्वलन कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी नियोजन केले आहे . ही यशवंत हरी ज्योत सोलापुरात दाखल झाली असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे यशवंत हरित ज्योतला शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर ज्योत घेऊन येणारे कृषिभूषण गोविंदराव पवार यांचे सहकारी हनुमंतराव कांबळे, रवी पवार , सुभाष कांबळे यांचा फेटा परिधान करून पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख,सरचिटणीस श्यामराव गांगर्डे, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे, सचिन घोडके ,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे, सेहवाग उपस्थित होते...
No comments:
Post a Comment