सोलापूर - शहर उत्तर विधानसभा युवक कॅांग्रेसचे अध्यक्ष महेश (पैलवान) लोंढे च्या वतीने स्वर्गीय संभाजीराव शिंदे यांच्या स्मरणार्थ सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक आवारात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. एसटी स्टँड आवारात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वाढत्या उन्हामुळे कोणत्याही प्रकारची पाण्याची अडचण भासू नये परगावाहून प्रवासी व नागरिक येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हा उद्देश ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे महेश लोंढे यांनी सांगितले.
यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी बोलताना म्हणाले की हा अतिशय चांगला उपक्रम राबविला यामुळे नागरिकांची तहान भागविण्याच्या दृष्टिकोनातून हा अतिशय चांगला उपक्रम राबवून रखरखत्या उन्हात युवक काँग्रेसच्या पाणपोईच्या पाण्यामुळे प्रवाशांना आत्मिक समाधान मिळेल असे गौवोद्गार काढले.
याबद्दल महेश लोंढे यांचे विशेष कौतुक केले उन्हाळ्याच्या दृष्टीकोनातून असे उपक्रम शहराच्या प्रत्येक भागात युवक काँग्रेसने राबविण्यात यावे असे आवाहन केले़.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर विभागीय नियंत्रक अमोल गोंझारी, वरिष्ठ आगर व्यवस्थापक उत्तमराव जोंधळे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक नागनाथ जाधव, कॅांग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निम्बर्गी, नगरसेवक सी ए.विनोद भोसले, शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, भिमशक्ती संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, एडवोकेट करीमुनिसा बागवान, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भैरू लोंढे, शोभाताई बोबे, विवेक कन्ना, शाहू सलगर, सुनील होटकर, राजेंद्र शीरकुल, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, नूरअहमद नालवार, श्रीकांत दासरी, राजाभाऊ निकम, यश शिंदे, निखील पवार, गणेश वाघमारे, सुरज शिंदे, एस.टी स्टॅन्ड रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष अतिश शिंदे, विष्णू जाधव, सुदर्शन कांबळे, मल्लू सलगरे, अभिजीत डोलारे, अभिजीत पटोळे, गणेश चंदनशिवे, आदित्य म्हमाणे, महेंद्र शिंदे, अजय रणदिवे, पृथ्वीराज लोंढे, आकाश जांभळे, प्रफुल्ल फडतरे, आकाश इंगळे, पृथ्वीराज जाधव, दिगंबर गायकवाड, ओंकार शिंदे, साहिल जाधव, विनायक सज्जन, बंटी खंदारे, महेश कांबळे, अभिषेक अचूकुटला, महादेव लोखंडे, अभिषेक सोनवणे, साहेबराव पवार, समाधान मोरे, विजय रणदिवे, नागेश भुतवाळे, ओम कदम, मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment