सोलापूर - सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील बुवा गल्ली व अंतर्गत परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती बऱ्याच ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत होती अनेक ठिकाणी पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेतील विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे सन २०२३-२४ या अंतर्गत १८ लाख ९५ हजार १२६ रुपये खर्चित नवीन पिण्याचे पाईपलाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, अमोल लकडे, अमोल जगताप, माऊली जरग, शिवाजी कांबळे,दत्ता जाधव,दिलीप चव्हाण, तुकाराम पाटणकर,उमेश जाधव, महालिंग जाधव, दीपक केकडे, बजरंग गिरकर,राम चव्हाण, प्रकाश केकडे, मारुती कांबळे, पांडुरंग कांबळे, जाधव मामा,कुमार केकडे, उमा मावशी लकडे, शारदा जगताप, सुरेखा डांगे पाटणकर,मोरे मावशी, मनीषा जगताप, हर्षदा चव्हाण, कोमल वाघमारे, छाया हजारे, सुरेखा चव्हाण, छाया घुले,पूजा पाटणकर, आरती पाटणकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या उपस्थित या नवीन पाईपलाईन कामाचे शुभारंभ विधिवत पूजनाने करण्यात आले.
दरम्यान सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या आणि माझ्या प्रयत्नातून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती शिवाय या परिसरात असलेली पाईपलाईन देखील खूप जुनी झाली होती परिणामी नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नव्हती ही समस्या लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून या नवीन पिण्याच्या पाईपलाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले.
या परिसरातील पाईपलाईन कामामुळे या भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत आणि येथील स्थानिक नागरिकांना उच्च दाबाने पाणी पुरवठा होईल अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केली. प्रभाग २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे खूप मोठे योगदान आहे.
प्रभागातील प्रत्येक परिसर हा मूलभूत सुविधा पासून वंचित राहू नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो या पुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील यावेळी किसन जाधव यांनी दिली.
0 टिप्पण्या