सोलापुरातील औद्योगिक क्षेत्रातील सर्व कारखान्यांची तपासणी करा

 


सोलापूर - १८ मे रोजी, अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी.तील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्यामध्ये घडलेल्या भीषण आगीचा आघात पाहता, पुढील अनर्थ रोखण्यासाठी व जीवित हानी थांबविण्यासाठी, सोलापुरातील सर्व औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांना भेट देऊन, तपासणी करा., अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, उपसंचालक कारखाने निरीक्षक सोलापूर यांना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या शिष्ट मंडळाद्वारे देण्यात आले. 

          






सदर निवेदनात सोलापूर अक्कलकोट रोड वरील एम.आय.डी.सी येथे १८ मे २०२५ रोजी, सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगे मुळे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान व आठ निरपराध लोकांचे भयानक मृत्यू झाले., सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगेचे स्वरूप इतके भयानक होते की., त्याचे वर्णन करणे देखील अत्यंत कठीण आहे. या प्रकरणाची दखल भारत देशाचे मा. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतली आहे. यावरून या प्रकरणाची गंभीरता लक्षात येते. 

             






गेल्या महिन्यात ही अक्कलकोट रोड , एम.आय.डी.सी. येथील पोमानी अप्रल्स या रेडिमेड कारखान्यात पाण्याचा हौद साफ करत असताना, दोन कामगारांचे मृत्यू झाले. यावेळी देखील सुरक्षा व जीव रक्षक साधनांचा अभाव यामुळेच या दोन युवकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे., असे प्रकार सोलापूर जिल्ह्यातील इतर एम.आय.डी.सीत भविष्यात देखील झालेत किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही जबाबदारी  शासनाने नेमून दिलेल्या आपल्या कार्यालयाची आहे., हे नाकारून चालणार नाही. म्हणून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, म्हणून आपण कारखाने निरीक्षक या नात्याने सोलापुरातील सर्व एम.आय.डी.सी.तील सर्व कारखान्यांना भेट देऊन तपासणी करणे गरजेचे आहे. म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने आपणास सदर निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत.

                  





तरी माननीयांनी आमच्या या निवेदनाची गंभीरतेने दखल घेऊन, एम.आय.डी.सी.तील सर्व कारखान्यांना भेटी देऊन तपासणी करून, नियमबाह्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी., अशी विनंती., अन्यथा या पुढील एम.आय.डी.सी परिसरातील होणाऱ्या दुर्घटनेस आपण स्वतः जबाबदार राहाल., आणि आमच्या संघटनेच्या वतीने आपणा विरुद्ध जनजागृती अभियान राबवण्यात येईल., असे नमूद करण्यात आले आहे. 

     






विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर, प्रसाद जगताप, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, आदींचा समावेश होता. 






             

सोलापुरातील एम.आय.डी.सी. क्षेत्रातील सर्व कारखान्यांची तपासणी करा., या मागणीचे निवेदन मा. उपसंचालक श्री ओंकार चौरे साहेब यांना देताना, विष्णू कारमपुरी (महाराज) व महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या