आसरा समांतर उड्डाणपूलाचे काम सुरू... स्ट्रीटलाईटचे पोल काढण्यास सुरूवात

 



सोलापूर - आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी यांचे दीड वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत.  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर आता शुक्रवार, 23 पासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. महापालिकेची स्ट्रीट लाईट काढण्यात आले असून आता लवकरच एमएसईबीचे पोलही काढण्यात येणार आहेत.

    






आसरा समांतर उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 2023 मध्ये 32 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या पुलाचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिनीचा अडथळा येणार होता. ती जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी तब्बल दहा ते बारा कोटींची आवश्यकता होती. मात्र  पैसे नाहीत म्हणून महापालिकेने हे काम करण्यास नकार दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासनानेही हात वर केले होते.आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य शासनाकडून हे 12 कोटी रुपये  मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता मात्र येथेही विलंब झाला. त्यामुळे हे आसरा पुलाचे काम रखडले होते. मात्र त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी पाईपलाईन स्थलांतरित न करता पूल कसा करता येईल याबाबत रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी, नॅशनल हायवे यांच्यासह अनेकांच्या बैठका घेतल्या.  त्यासाठी एक समितीही स्थापन केली. त्यानुसार महापालिकेची पाईपलाईन हस्तांतरित न करता हा पूल कसा करता येईल याचा प्लान तयार केला आहे.  त्यानंतर अक्षय तृतीया मुहूर्तावर आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या पुलाचा या पुलाचे भूमिपूजन पार पडले. आता शुक्रवारपासून कामाला सुरूवात झाली आहे. 






या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात झाडे आहेत. झाडे काढण्याची परवानगी पर्यावरण विभागाकडून मिळाली नव्हती. आता ती परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काम सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे पोल काढण्यात आले आहेत. त्यानंतर एक-दोन दिवसात एमईसीबीचे पोलही काढण्यात येणार आहे. हे पोल काढण्यात आल्यानंतर झाडेही काढण्यात येणार आहेत. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

  

 




काम चांगले आणि दर्जेदार करा - येत्या वर्षभराच्या कालावधीत हा पूल पूर्ण होणार आहे.   काम चांगले आणि दर्जेदार करा याशिवाय लवकरात लवकर करा अशा सक्त सूचना दिल्या. दिलेल्या मुदतीच्याआधी काम पूर्ण केले तर आनंदच होईल असेही आमदार सुभाष देशमुख म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या