श्री सिद्धेश्वर बालक मंदिर येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा

 


सोलापूर - श्री सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेत प्रथम दहावी 2007 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल 18 वर्षानंतर 40 माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पार पडला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून स्पोर्ट्स किट सेट भेट वस्तू म्हणून देण्यात आले.






या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री पशुपती माशाळ साहेब,माध्यमिक शाळेचे प्राचार्य श्री नागेश रायकोट सर, नर्सरी शाळेचे प्राध्यापिका सौ हेबाळ मॅडम, कुंभार मॅडम,होर्तीकर सर आदी शिक्षिकवृंद उपस्थित होते. 





कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ पूजा दुलंगे यांनी मांडले. सूत्रसंचालन: श्री गणेश येळमेली यांनी केले. आभार प्रदर्शन: श्री निनाद पाटील यांनी मांडले.






माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी महेश मलजी,महेश येळमेली,पूजा दुलंगे,धनश्री ईमडे,दीपक कुरापाटील,संजय पाटील,कुणाल नागशशेट्टी,पूजा कांबळे,अमृता पाटील,आरती बेगमपुरे,अश्विनी काटवे,सूरज लंगडे,संतोष स्वामी,महादेव नारायणकर,स्नेहल मंगलगी,प्रियांका शरणार्थी, विशाल म्हमाणे,केदार होळीमठ, श्वेता शिंगे, सागर हिरेमठ, रोहित उपासे, आशिष गोटे, उमेश जगताप, आनंद सुपेकर, शिवकुमार स्वामी, किरण साळुंखे, निवेदिता दड्डी, विश्वनाथ जडगे यांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या