किरण पवार चषक केपीसीसी संघाने पटकावला

 




सोलापूर - कै.किरण पवार चषक 2025 स्पर्धेचा बक्षीस समारंभ भंडारी मैदान येथे संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा 40 षटकांची बाद पद्धतीची होती. स्पर्धेतील विजेत्या केपीसीसी संघास चषक व रुपये 5000 देण्यात आले. उपविजेता भंडारी क्रिकेट क्लबला चषक व रुपये 3000 देण्यात आले. 





स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. १. अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू यश मंगरूळे २. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, समर्थ कोळेकर, ३. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज जयंत मित्र गोत्री, ४. मॅन ऑफ द सिरीज ओम चव्हाण या स्पर्धेसाठी संपूर्ण बक्षिसे डॅनिश केक यांनी पुरस्कृत केली होती.





सदरचा बक्षीस समारंभ सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, सचिव चंद्रकांत रेम्बर्सो , टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे, 14 वर्षाखालील निवड समिती चेअरमन राजेंद्र गोटे, 16 व 19 वर्षाखालील निवड समिती चेअरमन सुनील मालप, निवड समिती सदस्य किशोर बोरामणी व शिवानंद अकलूजकर यांचे हस्ते करण्यात आले. 






सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गोटे व शिवानंद अकलूजकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यास मोलाचा सहभाग असणारे राजू रंगम व किरण दिगे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या