सोलापूर - ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि ईच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक २२ येथील सेटलमेंट ग्राउंड(मरगू मास्तर मैदान) येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर आणि आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी शहर सेक्रेटरी प्रमोद भोसले,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता जोगदंनकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, रुक्मिणी जाधव,सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अजित बोराडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, बिराजदार मावशी ,राष्ट्रवादी शहर सरचिटणीस संगीता गायकवाड यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलनाने या शिबिराचे शुभारंभ करण्यात आले प्रारंभिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मैदानावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तदनंतर सर्वसामान्य नागरिकांना व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत लहान बालक गर्भवती माता आणि ज्येष्ठ नागरिक या तिघांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार किसन जाधव आणि चेतन नागेश गायकवाड यांनी केले.
दरम्यान या परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाचे मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार व्हाव्यात या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आपला दवाखाना या आरोग्य सेवा केंद्राचे या ठिकाणी शुभारंभ करण्यात आले या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाचे आरोग्य सेवा मिळेल नागरिकांना आरोग्य विषयक माहिती आणि मोफत औषधोपचार या पुढील काळात होईल अशी खात्री प्रास्ताविकात किसन जाधव यांनी व्यक्त केली.
या शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली ज्यात मधुमेह रक्तदाब हृदयविकार आणि इतर सामान्य आजाराचा समावेश होता तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली आणि योग्य मार्गदर्शन केले शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना औषधं देण्यात आले. हजारो गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की किसन जाधव, नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड हे नेहमी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी पाठपुरावा करीत असतात कोट्यावधी रुपयांचे कामे त्यांनी प्रभाग २२ विकासासाठी खेचून आणले आज मोफत शिबिरामुळे गरजू लोकांना आरोग्यसेवा मिळाले आपला दवाखाना या माध्यमातून आरोग्य सेवा आणखीनच सुधारणार आहे शिबिरामुळे आरोग्य सेवा आणि जनजागृती वाढण्यास मदत होते हा उपक्रम इच्छा भगवंताची परिवाराने राबविला हे कौतुकास्पद आहे या पुढील काळात देखील महायुतीतील घटक पक्ष म्हणून प्रभाग २२च्या सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळात भरघोस निधी उपलब्ध करून देईन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी केले लक्ष्मण मामा जाधव यांच्या आशीर्वादाने जनसेवेचा वसा त्यांनी कायम ठेवला आहे असे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी केले आहे राष्ट्रवादीचे विचारधारा हे लोकांमध्ये रुजवण्याचे कार्य देखील त्यांनी केले आहे या पुढील काळात त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू असे मनोगत शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केल.
दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर आरोग्य शिबिरास माजी नगरसेवक तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव इरफान शेख,आसिफ राजे शेख, सलीम नदाफ, वसीम शेख, जावीर जे.डी, साबील आडते, अखिल नाईकवाडी, आदींनी किसन जाधव यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
सदर आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत जाधव,विनोद गायकवाड, उमेश जाधव,शरद शिंदे, सचिन गुत्तेदार, संतोष ऋतिक गायकवाड, हरीश तेलुगु, संतोष लोंढे, अमोल जगताप,किरण शिंदे, प्रथमेश पवार, संजय सांगळे, प्रज्ञासागर गायकवाड दिनेश आवटे, शितल शिरसागर, किरण सगटे, तेजस गायकवाड, कार्तिक जाधव,उत्कर्ष गायकवाड, अजिंक्य जाधव, करण जाधव, माऊली जरग, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, महादेव राठोड, आनंद गाडेकर,हुलगप्पा शासम यांच्यासह इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे, सविता कोळी पंढरपूर यांनी केले
0 टिप्पण्या