अहिल्यादेवींचा अर्धा कृती पुतळा पूर्णाकृती व्हावा... मुख्यमंत्र्यांना 1000 पत्र देणार





सोलापूर - पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून राजमाता अहिल्यादेवींची जयंती शंभर ठिकाणी साजरी करण्यात आली.





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात भव्य रक्तदान शिबिर व अहिल्यादेवी जयंती घराघरात अहिल्यादेवी जयंती मनामनात ह्या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्यास संस्थेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची पूर्ण कृती मूर्ती भेट देण्यात आले त्याचबरोबर सोलापूर शहरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात असलेला अर्धा कृती पुतळा पूर्णाकृती व्हावा ह्या आशेचा होळकर मावळ्या च्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून 1000 पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे देण्यात आले व एकूण रक्तदान 100 झाले व पूर्ण कृती मूर्ती 100 वाटप करण्यात आले.







या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित आमदार देवेंद्र कोठे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पीआय लकडे, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख अमर पाटील, शेखर बंगाळे (सल्लागार), अनिकेत पाटील (भारतीय जनता पार्टी)  आदीजनांची लाभली.






यासाठी वीशेष प्रयत्न ओंकार कोरे, रणजीत मळगे, लखन शिवणगी, आकाश नागणकेरी, रोहित बंडगर, मल्लिकार्जुन मैत्री, संतोष बेळळे, चेतन पुजारी महासिद्ध देवस्थान ट्रस्ट, संदीप कांबळे, नागेश सदलापूरकर, राहुल स्वामी, अक्षय उमरदंड, संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या