सोलापूर - संगणकाच्या युगात अनेक नवनवीन बदल आणि आधुनिकता येत असताना सध्या ए आय म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्ता याचा जगभर वापर सुरू होत असल्याने या ए आय चे फायदे आणि त्याचे नुकसान यावर जगप्रसिध्द लेखक माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने शनिवार दि. 7 जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये सायंकाळी 6.25 वा. होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
जगभरातल्या संगणक क्षेत्रातील विविध कंपन्यामध्ये 23 वर्षे काम करून केवळ तांत्रिक ज्ञानच नाही तर विविध संस्कृती, विचार आणि तंत्रज्ञानाची दृष्टी आत्मसात करणारे अच्युत गोडबोले तांत्रिक लेखणातही सिध्दहस्त आहेत.
अनेक पुस्तकेही त्यांनी लिहली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि सध्या जगभरात आणि आपल्या देशातही सर्वच क्षेत्रात वापर वाढत असलेल्या ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्ता याबाबत सविस्तर माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून सोलापूरकरांना मिळावी या हेतुने महाराष्ट्र साहित्य परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नेहमी सोलापूरकरांना विविध प्रकारचे कार्यक्रमाची मेजवानी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या