सोलापूर - रविवार दि. 29/06/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता. श्राविका चौक, बुधवार पेठ, सोलापूर येथे देवशयानी आषाढी एकादशी (पंढरपुर वारी)साठी शेगावहुन सोलापूर मध्ये आगमन होणाऱ्या संत शिरोमणी शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज यांच्या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी सांप्रदायास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त. मा. रवी पवार साहेब, नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्यावतीने फ्रेशअप किट (कोलगेट, ब्रश, अंगाला लावायचा साबण, कपड्याचा साबण, तेलाची बाटली, इ.) वाटप करण्यात आले.
यावेळी प्रथम संत शिरोमणी शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवार पेठ परिसरातील श्राविका चौक येथे होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या वतीने पालखीस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सो.म.पा.मा. नगरसेवक गणेश पुजारी,सो.म.पा.मा. नगरसेवक अमर पुदाले, उद्योजक पुरुषोत्तम धूत, पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम (महाराज) चंदनशिवे, ॲड.औदुंबर तीर्थकर ,आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, आरोग्य निरीक्षक सचिन कदम, आरोग्य निरीक्षक नरसिंह बच्चू, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव, पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, मनोज थोरात, हृदयनाथ मोकाशी, कपिलेश पुजारी ज्योतिर्लिंग कारंडे , उमेश रणदिवे, आदित्य चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, बाळराज जाधव, राहुल बागले, अजय इंगळे, अमोल बनसोडे, योगेश सरवदे, रवी सकट, रंगा वाघमारे, समीर सय्यद ,ओम निकाळंबाळकर, प्रशांत कांबळे ,सिद्धू जिरगे, आकाश कुचेकर, अक्षय मस्के, अभिजीत गायकवाड, कपिलेश पुजारी, ज्योतिर्लिंग कारंडे, सचिन बनसोडे, विकास गावडे, अजित जाधव, सतीश अडाकुल, आदित्य साबळे, निखिल शिंदे, रोहन तळभंडारे, बुधवार पेठ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या