सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर करणे, राजमुद्रा बसवणे, परिसरातील दगड कलर करणे कारंजे चालू करण्या संदर्भात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सोबत मध्यवर्ती महामंडळ ची बैठक संपन्न झाली होती.
गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात राजमुद्रा बसवणेची जागा पाहणी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुतळा कलर, दगड कलर आणि कारंजेची पाहणी ही केली. १४ मे च्या आत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची १० फुटी राजमुद्रा बसवण्यात येणार आहे. परिसरातील दगड कलर करण्यात येणार आहे व कारंजे ही चालू होणार असल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी दिली.
यावेळी राजाभाऊ गेजगे, हरिभाऊ सावंत, नागेश भोसले, सुमंत जगदाळे, सागर गायकवाड, अक्षय दोडमशी, अक्षय माळवदकर, कैलास डिगे, जानगवळी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment