सोलापूर - विविध बँकांमध्ये बँक मित्र म्हणून काम करणाऱ्या सोलापुरातील जवळजवळ 100 बँक मित्रांनी आज त्यांच्या मागण्यासाठी पुनम गेट सोलापूर येथे कामगार दिनाचे औचित्य साधून मागणी दिवस व धरणे आंदोलन केले बँक मित्रांना मिळणारे कमिशन त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवाशर्ती तसेच इतर बँक कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुरक्षा मिळाव्यात इत्यादी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. बँकिंग क्षेत्रातील सर्वात बलाढ्य अशी संघटना ए आय बी इ ए यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईस फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
या आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन चे जिल्हा समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर, महाराष्ट्र बँक युनियनचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉम्रेड संतोष चित्याळकर, तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक कॉम्रेड अशोक इंदापुरे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काँग्रेस शंतनू गायकवाड, संयुक्त कामगार कृती दल समिती चे अध्यक्ष अॅड. एम एच शेख, रेल्वे माथाडी कामगार संघटनेचे कॉम्रेड रमेश बाबू, बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड औब्रि अलमेडा, महाराष्ट्र बँक रिटायरिज असोसिएशनचे कॉम्रेड प्रसाद आतूनुरकर, महावितरण कर्मचारी संघटनेचे काँ कोल्हे इत्यादींनी मार्गदर्शन केले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी सचिन काळे, सचिन संकद कॉम्रेड सोमनाथ ऐवळे व इतर कॉम्रेडसनी महत्त्वाचे योगदान दिले या आंदोलनात बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक इत्यादी बँकेतील अनेक बँक मित्र सहभागी झाले होते आंदोलनानंतर माननीय निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले