सोलापूर - दिनांक 09/04/2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत विविध संघटनांकडून रॅली काढून शेवटी रॅली चे रूपांतर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रिय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिच्छडा वर्ग मोर्चाचा सहभाग होता.
या आंदोलनात प्रमुख मागण्या या खालील प्रमाणे -
1) बहुजन महापुरुषांचा सतत षड्यंत्र करून अपमान करणाऱ्या RSS आणि BJP च्या विरोधात
2) केंद्र सरकारच्या वतीने ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करण्याच्या समर्थनात
3) लोकशाहीला धोका असणाऱ्या Evm मशीन चा वापर करून लोकशाहीतला मताचा अधिकार शून्य करणाऱ्या एलेक्शन कमिशन च्या विरोधात
4) बिहार गया येथील महाबोधी महाविहर ब्राह्मणाच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या हाती देण्यासाठी
5) वकफ कायद्यात सुधारणा करून मुसलमानाच्या धार्मिक अधिकार वर गदा आणन्याच्या विरोधात
यावेळी युवराज पवार, फारुक शेख, योगेश शिदगणे, फिरोझ शेख, ॲड. तुकाराम राऊत, महेश्वर निकंबे, चंद्रकांत फडतरे, प्रशांत गायकवाड, महादेव रणधरे, महेंद्र सोनवणे, भारत दळवी, शोभा गायकवाड, धनश्री शिदगणे, मनीषा सातपुते इत्यादी महिला आणि कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment