सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 22 चे कार्यसम्राट नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी पोगुल मळा परिसरात 19 लाख 8 हजार 299 लाख रुपये खर्चित पिण्याच्या पाईपलाईनचे शुभारंभ करण्यात आले.
प्रभाग 22 मधील रामवाडी पोगुल मळा येथे पाण्याची समस्या भेडसावत होती बऱ्याच दिवसांपासून काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत होते ते पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात होत होती ही समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ आज रोजी करण्यात आल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले. पाईपलाईन मुळे प्रभाग 22 मधील पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आशा देखील यावेळी किसन जाधव यांनी या पाईपलाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली.
या पाईपलाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी अनिश जाधव, नागेश यल्लाप्पा जाधव, राजेंद्र शिंदे आकाश बाबू नाईक वसीम शेख, गोपाल नाईक तौफिक शेख, अब्बास बागवान, निहाल गायकवाड, साहिल शेख,बाळू ढाळे, रघुनाथ नाईक फिरोज पठाण अनिता पवार तनुजा गायकवाड सायरा चौधरी समीना चौधरी रिजवान बागवान, आयेशा मकानदार,सरस्वती बनसोडे,श्रीदेवी पोथीनुर शेख, स्वाती जाधव, पुष्पाताई जाधव आदींचा व ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि या परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment