सोलापूर - शहरांमध्ये सध्या लोकसंख्या व वाहनांची संख्या प्रचंड वाढल्या कारणामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवत आहे ते पार्किंगच्या नावाखाली नागरिकाकडून लूट केली जात असून त्यांच्या ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करण्यात यावी व पे पार्किंगच्या ऐवजी नागरिकांना फ्री पार्किंग करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने सोलापूर महानगरपालिका उपायुक्त तैमूर मुलांनी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोलापूर शहरातील मोठमोठे इमारती बांधकाम परवाना देताना त्यांना पार्किंगची जागा राखीव ठेवणे आवश्यक असताना सुद्धा अनेक इमारतींना पार्किंगची सोय नाही पार्किंगची जागा व्यवसायिक दराने दुकाने थाटलेले आहेत त्याकडे बांधकाम परवाना देताना अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारातून याकडे दुर्लक्ष केले जात तसेच शहरातील काही ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पे पार्किंग चा ठेका देण्यात आलेल्या आहे तो ठेका संपून सुद्धा अद्यापही पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून आर्थिक लूट केली जात आहे यास महानगरपालिकेतील काही अधिकारी जबाबदार आहेत.
सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटी समावेश करण्यात आला व सोलापुरातील काही रस्त्यांची काम करण्यात आले त्यामध्ये रस्ते अरुंद करण्यात येऊन फुटपाथ मोठे करण्यात आलेले आहेत आणि त्या फुटपाच्या वापर काही लोक व्यवसायिक म्हणून अतिक्रमण केलेले दिसून येते सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे सध्या अतिक्रमण विभाग हा नावालाच राहिलेला आहे कधीतरी एखादी कारवाई करायची आणि बाकी शांत बसायचे कारवाई मध्ये सातत्य नसल्याने सोलापूरचे अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे तरी आयुक्त साहेबांनी या संबंधित गोष्टीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव शहर शहराध्यक्ष शिरीष जगदाळे सचिव सिद्धाराम सवळे शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जागीरदार आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment