सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा त्रिनेत्र फूडमॉल येथे सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आय.आर.एस. मल्लिनाथ जेऊरे (डिप्टी कमिशनर, कस्टम – मुंबई) यांच्या हस्ते डॉ. शेटे यांना श्री मशरूम गणपतीची प्रतिमा व शाल देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, बाळासाहेब वाघमारे, गुरुशांत धूतरगांवकर,कनिष्क वाघमारे, नीलकंठ पाटील, दीपक देशमुख, नागराज हौशेट्टी, राजू हौशेट्टी तसेच मित्र परिवार यांची उपस्थिती लाभली होती.
या सत्कार समारंभात उपस्थितांनी डॉ. शेटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment