स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळा...२० मे रोजी बांधल्या जाणार रेशीमगाठी - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, April 11, 2025

स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळा...२० मे रोजी बांधल्या जाणार रेशीमगाठी

 


 


सोलापूर : स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने पुढील महिन्यात मंगळवार २० मे रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन शेळगी येथे करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिली.





या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वधू-वरांना  कपाट,मणी मंगळसूत्र,संसारोपयोगी  भांडे सेट,शालू,जोडवी,सफारी, चप्पल, बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. यासह सहभागी वधू वरांकडील पाहुणे मंडळींसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे.विवाह सोहळ्यानिमित्त सजविलेल्या बग्गीतून वधू - वरांची पारंपरिक वाद्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे.




या विवाह सोहळ्यातील वधू - वरांना आशिर्वाद देण्यासाठी काशी जगद्गुरु श्री श्री श्री विश्वराध्य डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 





गोरगरिबांचा विवाह सोहळा थाटात व्हावा, वधू-वरांच्या दोन्ही परिवाराला आर्थिक झळ बसू नये या उद्देशाने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मोतीबिंदू शिबिर राबून आजतागायत ५ हजारहून  अधिक रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात आले आहे. तुळजापूर ला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक वर्षी मोफत औषध उपचार ची सोय करण्यात येत असते. होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले आहे.अशा समाजपयोगी आणि विधायक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असते. या विवाह सोहळ्यात ज्या वधूवरांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी १० मे पर्यंत आपली नावे राहुल शाबादे मो.९५९५५६५०५०, सोमनाथ मेंडके ९७६४९६५०००,सोमनाथ रगबले ९९२२०१८६४१, संजय कणके ९८२३३७६१७७,यांच्याकडे नोंदणी करावे असे आवाहन सोमनाथ रगबले यांनी यावेळी केले.




या पत्रकार परिषदेस संजय कणके, ज्ञानेश्वर कारभारी, वीरेश उंबरजे, शिवानंद पुजारी, सुभाष कलशेट्टी, राहुल शाबादे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot