सोलापूर - 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की, गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन मार्गी लाऊ. त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2025 रोजी दुपारी 12.30 वा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके व उप भूमी अधीक्षक सावंत हे विडियो कॉन्फ्रेंस द्वारे उपस्थित होते.
सोलापूर शहराचे 1992 नंतर हद्ददवाढ झाल्या नंतर सोलापूर शहारालगतचे बसवेश्वरनगर, शिवाजीनगर, प्रतापनगर, दहिटणे, मजरेवाडी, नेहरू नगर, केगाव, कसबे सोलापूर, बाळे, सोरेगाव, कुमठे, देगांव, शेळगी ही गावे सोलापूर मनपा मध्ये समाविष्ट झाले. परंतु या गावकऱ्यांना शहराप्रमाणे कोणतीही सुविधा मिळाले नाहीत. गुंठेवारीला परवानगी नसल्याने अनेकांना नोटरी द्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागत आहे. या 12 गावातील नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
या भागातील राहिवाश्यांना गुंठेवारीला परवानगी मागीतल्या वर भूमीअभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा व मालकीचे मूळ कागदपत्र असल्या शिवाय परवानगी मिळत नाही. यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही या मुळे या भागाचा विकास थांबला असल्याने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे केली.
यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले की आमदार विजय देशमुख यांच्याशी संपर्कात राहून सोलापूर शहरात गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली लावावे असे निर्देश दिले.
या बैठकीस ज्ञानेश्वर कारभारी, सोमनाथ रगबले, किरण पवार, ॲडव्होकेट फुलारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment