सोलापूर - पंचायत राज व्यवस्थेत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त आहेत.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ऑन जॉब ट्रेनिंगसाठी देखील संधी उपलब्ध होऊ शकते असे मत शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ.सागर डेळेकर यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात इंडस्ट्री अकॅडमीया मीट चे आयोजन करणेत आले. या कार्यक्रमांमध्ये विविध इंडस्ट्रीशी संबंधित उद्योजक तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, विविध विभागाचे प्रमुख व संशोधक उपस्थित होते. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ.सागर डेळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार आणि उद्योग यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना असतात आणि या कल्पनांना स्वयंरोजगारांमध्ये परावर्तित केले जाऊ शकते.त्यासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेली ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या अध्यक्षस्थानी शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंदचे प्राचार्य डॉ.सी.जे. खिलारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले हे महाविद्यालय सामाजिक बांधिलकी मानून विद्यार्थ्यांना रोजगार क्षम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत असून त्यासाठी इंडस्ट्री क्षेत्रातील प्रतिनिधींनी व शिक्षण तज्ञांनी महाविद्यालयास सहयोग करावा.
असे सांगितले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव म्हणाले पंचायत राज मध्ये रोजगाराच्या खुप संधी आहेत. सेंद्रीय शेती बरोबर स्थानिक युवकांनी सेंद्रीय शेतमाल उत्पादनाकडे वळावे. सेंद्रीय मालाचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.
या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डाॅ. समाधान माने , उप प्राचार्य डॉ.राजेश कवडे,डॉ. टी.व्ही.अनंतकवळस, डॉ.बी .एस.बळवंत, डॉ. अमर कांबळे डॉ.सुशील शिंदे आदी उपस्थित होते.