Swarajya News Marathi : जिल्हा माहिती कार्यालय

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label जिल्हा माहिती कार्यालय. Show all posts
Showing posts with label जिल्हा माहिती कार्यालय. Show all posts

Friday, April 18, 2025

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधावा

April 18, 2025 0

 

           


सोलापूर - संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सर्व दिवस चोवीस तास सुरू आहे. कुठेही बालक संकटात असल्याचे जाणवताच नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करून त्याला मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

        





पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडबली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असलेबाबतच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच सदर संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झालेबाबत निदर्शनास येत आहे. ही बाब हि अत्यंत गंभीर स्वरूपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहेत.

          





बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षे कारावास तसेच रुपये 1 लाखांपेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतूद नमूद करण्यात आलेली आहे.

                  





नागरिकांनी आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधुन बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही महिला व बाल विकास आयुक्त, नयना गुंडे यांनी केले आहे.

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन

April 18, 2025 0

 


सोलापूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी दि.10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्यप्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्य:स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे ( उदा.आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.






कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या दि.09 जुलै 2024 अन्वये "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरु करण्यात आली आहे.  या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता मा. मुख्यमंत्री महोदय यांनी घोषित केल्यानुसार आता दि.10 मार्च 2025 शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला.






या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन DBT द्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे Aadhar Seeded DBT होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते Aadhar Seeding करून घ्यावी.






तसेच ज्या आस्थापना हे या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  दि.10 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी (Aadhar Verify) अनिवार्य आहे. ज्या बँक अकाऊंट ला आधार लिंक आहे, तोच बँक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन DBT साठी नमुद करणे आवश्यक आहे.







प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार पडताळणीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Intern Login Sign up आधार नं. प्रविष्ट करणे- send OTP- Verify OTP The intern enters the received OTP Successful Login and Access, Once OTP verification is successful, the intern gains access to the system.

       






सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापनानी प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना/नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सोलापूर यांच्याशी दि.30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी.

        





उमेदवारांना व आस्थापनांना त्याबाबत काही समस्या असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर या कार्यालयास 0217-2992956 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा.

Read More

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी "जागेवर निवड संधी"

April 18, 2025 0

 


 

सोलापूर - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथील मॉडल करिअर सेंटर येथे शुक्रवार दि. 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वा. पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांकरीता "जागेवर निवड संधी"  चे आयोजन करण्यात येणार असून, सदर "जागेवर निवड संधी" (PLACEMENT DRIVE) मध्ये जिल्हयातील  कीया मोटर्स सोलापूर आणि  किरण एन्टरप्राईसेस, सोलापूर हे उद्योजक सहभागी होऊन, प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत. या "जागेवर निवड संधी" (PLACEMENT DRIVE) मध्ये आय. टी. आय. प्रकारच्या शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना जागेवर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.







नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करुन  वरील ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती देण्यात याव्या, तसेच www.ncs.gov.in या वेबसाईटवर जास्तीत जास्त उमेदवांनी सहभाग नोंदवावा व संधीचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी 0217-2992956 या क्रमांकावर साधावा.






तरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर श्रीमती संगीता खंदारे, यांनी केले आहे.

Read More

सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

April 18, 2025 0

 


           

सोलापूर - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

           







शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 5 मे ते 14 मे  2025 या कालावधीत   SSB कोर्स क्र.61 आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण , निवास व भोजन दिले जाणार आहे.

          







सोलापूर जिल्हयातील इच्छूक उमेदवारांनी  सैन्य दलातील अधिकारी पदांची संधी उपभोगण्यासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , सोलापूर येथे  दि. 24 एप्रिल 2025 रोजी  मुलाखतीस हजर रहावे.  मुलाखतीस येते वेळी  त्यांनी  डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे  (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करून  त्यामधील SSB-61 कोर्स साठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक  कल्याण कार्यालयाचे  प्रिंट दिलेल्या)  प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिष्टांची प्रिंट  घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

        









एसएसबी वर्गामध्ये  प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद कोणतीही एक पात्रता असणेआवश्यक आहे.  त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना घेवून यावे.

         









प्रशिक्षणार्थी कम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSE) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी  एक्झामिनेशन  (NDA-UPSE) पास झालेली असावी व त्यासाठी  सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. व त्यासाठी  एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास  झालेली असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स साठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापिठ प्रवेश प्रणाली  (युनिर्व्हसिटी इनट्री स्कीम) साठी एसएसबी कॉल लेटर असावे  किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

         








अधिक माहितीसाठी  प्रभारी अधिकारी छात्र प्रशिक्षण केंद्र  नाशिक रोड  नाशिक यांचा ई मेल आडी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र.0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र.  9156073306 वर कार्यालयीन वेळेत  प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सोलापूर यांनी केले आहे.

Read More

उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत

April 18, 2025 0

 

           


सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील  सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दुपारी 12.00 वाजता बहुउद्देशिय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            







सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत. सदर नियमान्वये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रीयांसह ) सरपंच पदे निश्चित करावयाची आहेत.  









तालुक्यातील पदाधिकारी व  नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास निश्चित केलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार, उत्तर सोलापूर यांनी केले आहे.

Read More

Thursday, April 17, 2025

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आज सोलापूरात... असा असेल दौरा

April 17, 2025 0

 


सोलापूर - राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे गुरूवार दि.17 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.




दि.17 एप्रिल 2025 रोजी चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून विमानाने दुपारी 4.00 वाजता सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 4.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने नवनाथ नगरकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता नवनाथ नगर, एमआयडीसी रोड, पेट्रोलपंप सोलापूर येथे मल्लिकार्जून पाटील यांच्या निवासस्थानी चहापान तदनंतर मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर येथे 51 फुटी हनुमान मुर्तीच्या महाआरतीस उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता      श्री क्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांचे दर्शन. सायंकाळी 6.00 वाजता हिंदु विराट सभेस उपस्थिती व संबोधन व रात्रौ 8.00 वाजता मोटारीने पुण्याकडे प्रयाण.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot