प्रत्येक प्रभागात सभासद नोंदणी अभियान राबविण्यावर भर द्या - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, March 22, 2025

प्रत्येक प्रभागात सभासद नोंदणी अभियान राबविण्यावर भर द्या

 





सोलापूर - पक्षाचे ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबूत करा तसेच प्रत्येक प्रभागा सभासद नोंदणी अभियान राबवून पक्षाचा प्रसार करा पक्ष विकास आणि लोकहिताच्या कामासाठी आपल्या पाठीशी आहे असे सांगत अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न शासन स्तरावर सोडविण्यासाठी हवी ती ताकद देण्याचे आश्वासन सुनील तटकरे यांनी भेटी वेळी दिले.




शुक्रवार दि. 21 मार्च रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी  प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले बाबा सालार यांनी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार केला. 





या भेटीत सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रभागाची पक्षाची स्थिती विविध विकास कामे व सभासद नोंदणी अभियान या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाबा सालार आणि त्यांचे सहकारी यांचे पक्षात स्वागत केले. 



याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबा भाई सालार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot