सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचे रखडलेले मानधन लाभार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्रातील निराधार, वृद्ध, अपंग, इतर गरजू लोकांसाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेमधील हजारो लाभार्थ्यांना गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून लाभ मिळत नसल्याने त्यांची फार मोठी कुचंबना होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन प्राप्त होण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देणे बाबत नम्र विनंती अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव, अजय इंगळे, आदित्य साबळे, भीमा मस्के उपस्थित होते.
No comments:
Post a Comment