पहलगाम हल्ल्याप्रकरणी जाळला पाकिस्तानचा झेंडा... पाकिस्तानची अंत्ययात्रा काढून केला निषेध - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, April 23, 2025

पहलगाम हल्ल्याप्रकरणी जाळला पाकिस्तानचा झेंडा... पाकिस्तानची अंत्ययात्रा काढून केला निषेध

 


सोलापूर :  जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. पहेलगाम प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 






प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या. गिन गिन के है बदला लेना जननी के अपमान का, नकसे परसे नाम मिटादो पापी पाकिस्तान का, भारतमाता की जय, वंदे मातरम्, जिसको चाहिये पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंड्याला चपलेचा हार घातलेले फलक हाती धरले होते. 






यावेळी पुरुषोत्तम बरडे म्हणाले, जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू कश्मीरमध्ये गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे निषेधार्ह आहे. भारताने त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारले पाहिजे. तसेच भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तत्काळ संपवले पाहिजे. आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का अशीही शंका येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखर हिम्मत असेल तर त्यांनी पाकिस्तानला त्वरित धडा शिकवावा.






यावेळी शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंतयात्रा काढण्यात आली. तसेच या तिरडीचे दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. 

 





याप्रसंगी पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, दत्तात्रय वानकर, ज्ञानेश्वर सपाटे, महेश धाराशिवकर, आशुतोष बरडे, सुरेश जगताप, विजय पुकाळे, दिनकर जगदाळे, तुषार खंदारे, प्रसन्न नाजरे, धनराज जानकर, रेवण पुराणिक, लहू गायकवाड, योगेश क्षीरसागर, सचिन सुरवसे, रविकांत गायकवाड, कृष्णा सुरवसे, बाळासाहेब माने, नाना मोरे, गजेंद्र माशाळ, शिवा कोळी, प्रशांत कदम, संभाजी कोडगे, रोहित सुरवसे, राहुल परदेशी, अण्णा गवळी, महेश गवळी, अजय अमनूर, विष्णुदास जवंजाळ, गणेश खानापुरे, संदीप भोसले, ओंकार सुतार, पंकज रणदिवे, लक्ष्मण शिंदे आदीसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot