पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध... कायमचा धडा शिकवण्याची गरज - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, April 23, 2025

पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध... कायमचा धडा शिकवण्याची गरज

 


सोलापूर : पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या गोळीबाराचा सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा दिल्या. 






यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने कायमच भारतीय सीमांवर दहशतवाद पसरवून देशभरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील अनेक हल्ले भारताने परतवून लावले आहेत. पहेलगाम येथे झालेला हा भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देतील याविषयी खात्री आहे.







यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे भारतीय हिंदू पर्यटकांवर जिहादी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या आहेत. दहशतवाद्यांच्या या कृत्याबद्दल संपूर्ण देशभरासह जगभरातील हिंदूंमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतीय सैनिकांच्या हत्या, नागरिकांच्या हत्यांच्या रूपाने हिंदुस्थानला हानी पोहचवत आहे. यातून हिंदुस्थानचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे, असेही शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यावेळी म्हणाले.







याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर चिटणीस बजरंग कुलकर्णी, सुधाकर नराल, मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे, दत्तात्रय बडगु, नागेश सरगम, नागेश खरात महेश देवकर, माजी मंडल अध्यक्ष गिरीश बत्तूल, अ.जा. मोर्चा अध्यक्ष मारेप्पा कंपली, किसान मोर्चा अध्यक्ष वैभव बिराजदार, महिला मोर्चा प्रदेश सचिवा रंजिता चाकोते, शहर महिला मोर्चा चिटणीस विमल पुठ्ठा, माजी नगरसेवक नगरसेवक संजय कोळी, विनायक विटकर, पदाधिकारी कार्यकर्ते मोहन डांगरे, राजकुमार पाटील, सतीश महाले, गुंडप्पा पाटील, श्रीनिवास पुरुड , आनंद बर्रू चेतन शर्मा, विजय ईप्पकायल, सोशल मिडिया सहसंयोजक अभिषेक भाईकट्टी, संकेत विभुते, माधव चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot