सोलापूर - दि. ०७/०४/२०२५ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून हॅलो मेडीकल फाऊंडेशन, अणदूर व अलायवस लाईफ सायन्सेस यांच्यावतीने कार्पोरेट सामाजिक उत्तर दायित्व निधीतून सोलापूर महानगरपालिका अंतर्गत दाराशा प्रसुतीगृह येथे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठीची अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन देण्यात आली. सदर मशीनचे लोकार्पण उपस्थित तीन गरोदर माता यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हॅलो मेडीकल फाऊंडेशन, अणदूर या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. क्रांति रायमाने तसेच अलायवस लाईफ सायन्सेसचे कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत कांबळे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे, सहा, आयुक्त गिरिश पंडित, आरोग्याधिकारी, डॉ. राखी माने, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सो.म.पा. शहर कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. अतिश बोराडे, दाराशा प्रसुतीगृहाच्या वैद्यकीय अधिकारी, डॉ. रेणूका लहांडे तसेच कर्मचारी वृंद व लाभार्थी महिला उपस्थित होते.
सदर लोकार्पण प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी श्री. आशिष लोकरे, यांनी जास्तीत जास्त गरजू गरोदर महिलांनी सोलापूर महानगरपालिकेच्या सदर अत्याधुनिक दाराशा प्रसुतीगृहा कडील मशीनच्या माध्यमातून मोफत तपासणी करुन घ्यावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment