सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी NTPC थर्मल प्लांटला भेट दिली.यावेळी NTPC चे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री कार्यकारी संचालक यांनी आयुक्त याचं पुष्पगुछ देऊन स्वागत केले. प्रथम NTPC चे महाप्रबंधक यांनी NTPC संदर्भात माहिती दिले.देगाव येथील 75 एम एल डी मलनिसारण केंद्र असून त्या ठिकाणी 25 एम .एल .डी. पंप पाऊस, 50 एमएलडी पंप पाऊस, प्रायमरी युनिट, सेकंडरी युनिट, क्लोरीन कॉन्टॅक्ट टॅंक, सोलार पावर प्लांट,बायोगॅस जनरेशन युनिट, सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा. तसेच मलनिसारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती व द्वितीय उपचार पद्धती करण्यात येतात. महानगरपालिकेच्या देगाव येथे 75 एम एल डी क्षमतेचे मला निसरण केंद्र असून. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिसरण केंद्रामध्ये सांड पाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिसरण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणारा सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते.
देगाव स्थित मलनिस्सारण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यात आलेले पाणी एनटीपीसीला पुरविण्यात आल्यानंतर पाण्याचा पुनर्वापर योग्य प्रकारे केला जाऊ शकतो. देगाव मध्ये मलनिसारण केंद्र येथे प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याच्या बदल्यामध्ये एनटीपीसी द्वारे त्यांची 72 एम एल डी क्षमतेची पाईपलाईन सोलापूर महानगरपालिकेत हस्तांतरित झाल्यास सोलापूर शहराची पाण्याची भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यास मदत होईल.
या सदर्भात चर्चा करण्यात आले. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय मोठा असून या ठिकाणी प्राणी संग्रहालय सुरु करणायच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण करण्यात येत असून त्या ठिकाणी आपण NPTC थर्मल पावर कडून आपल्या सी.एस.आर फ़ंडातुन सहकार्य करावे.
यावेळी बैठकिस अतिरिक्त आयुक्त रवि पवार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, NTPC चे के. एम बेबी,नवीन कुमार अरोरा, मनोरंजन सारंगी सर्वजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, रामचंद्र पेंटर, राहुल शिंदे नागपूर येथील डी आर ए कन्सल्टन्सी चे प्रतिनिधी मेहुल रानडे, रितेश रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment