सोलापूर - शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन सोलापूरच्या गफूर शेख यांची शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे या दोघांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये गफूर शेख यांची शिवसेना अल्पसंख्यांक महानगर प्रमुख सोलापूर शहर पदी निवड करण्यात आली आहे.
अनेक दिवसापासून शिवसेना पक्षाचे जोर वाढताना दिसत आहे. मागील निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने एक मोठा खारीचा वाटा सरकार स्थापनेमध्ये केला. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र शिवसेना पक्षाची स्थापना केली. सोलापूरचे अल्पसंख्यांक अध्यक्ष व अल्पसंख्यांक सेल हे पूर्णपणे रिक्त झाले होते. त्यातच गफूर शेख यांनी शिवसेना मध्ये प्रवेश करून ती पोकळी भरून काढली. नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये गफूर शेख यांची शिवसेना अल्पसंख्यांक महानगर प्रमुख सोलापूर शहर पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. नीयुक्तीपत्र देताना मंगेशी चिवटे यांनी जो विश्वास गफूर शेख यांच्यावर दाखवलेला आहे तो विश्वास खरा ठरवावा असेही प्रतिपादन मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गफूर यांना जबाबदारी दिली.
गफूर शेख यांची निवड झाल्यामुळे शहरातील संपूर्ण समाजाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment