सोलापूर - पूर्व वैमनश्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची घटना येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली.
शिवाजी जाधव व सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, श्रीमती सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी व 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले.
त्यांना तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे व दोन मॅक्झिन पोलिसांना मिळून आल्या.
दरम्यान घटना स्थळावर ठसे तज्ञांना पोलिसांनी पाचारण केले होते. घटना स्थळावर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उशिरा पर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.
No comments:
Post a Comment