सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटल जवळील सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यांमधून व लोधी गल्ली ,लष्कर या विभागातील असंख्य अनधिकृत नळांच्या कनेक्शन्स मधून संध्याकाळपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. हे पाणी सिव्हिल हॉस्पिटल, आडके हॉस्पिटल असे रस्त्यावरून व ड्रेनेजच्या चेंबर मधून वाहत जाऊन अश्विनी हॉस्पिटलच्या मैदानापर्यंत जात आहे. आडके हॉस्पिटलच्या जवळील ड्रेनेच्या चेंबर मधून अक्षरशः स्वच्छ पाण्याचे कारंजे उडताना दिसत आहे.
विशेष म्हणजे याबाबतीत डॉ.संदीप आडके यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. ओंबसे यांची समक्ष भेट घेऊन तक्रार करून सांगितलेले असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन यावर कोणतेही कारवाई करताना दिसत नाही.
या परिसरात महानगरपालिकेचे पंप हाऊस असून मुख्य जलवाहिनी असल्यामुळे येथून दररोजच पाणी सोडले जाते व अशी लाखो लीटर पाण्याची गळती दररोजच या रस्त्यावरून होताना दिसते आहे.एकीकडे सोलापुरात सात दिवसाआड पाणी मिळत आहे म्हणून लोक रस्त्यावर उतरलेले असताना येथे दररोज रस्त्यावर लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत असून महानगरपालिका प्रशासन यावर ठोस कारवाई कधी करणार?
No comments:
Post a Comment