सोलापूर - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बुधवार पेठ परिसरातील थोरला राजवाडा मिलिंद नगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार (प्रेरणाभूमी) व ऐतिहासिक पंचाची चावडी या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना भेट देऊन पाहणी केली.
सदर पाहणीच्या वेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार (प्रेरणाभूमी) व ऐतिहासिक पंचाची चावडी या परिसरातील झालेली दुरावस्था, दुरुस्तीची कामे, रंगरंगोटी आदी कामे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हाती घेण्याबाबत सूचना दिल्या.
या पाहणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, विभागीय कार्यालय क्रमांक 1चे अधिकारी अंत्रोळीकर, विभागीय कार्यालय क्रमांक 7 चे अधिकारी मुजावर, आवेक्षक शाम कन्ना, आवेक्षक प्रकाश सावंत, उद्यान प्रमुख जगदाळे, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, सिकंदर शेख, चंद्रकांत सोनवणे, महापालिकेचे कर्मचारी जयराज सांगे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment