सोलापूर - सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेत सोलापूर शहर अभियंता मा. आशिष मेहता यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
दि. 13/04/2025 ते 20/04/2025 या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर शहर विद्युत विभागाच्या वतीने स्टेट लाईट दुरुस्त करणे, वीज पुरवठा चालू ठेवणे अशा प्रकारच्या सूचना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.
यावेळी विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, मा. नगरसेवक आनंद चंदनशिवे, मिलिंद प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे, रविकांत कोळेकर, शांतीकुमार नागटिळक, अजित बनसोडे, अशितोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, चंद्रकांत सोनवणे, लखन भंडारे, उमेश रणदिवे, विनोद वाघमारे, पंकज ढसाळ, आझर शेख, चेतन भडकुंबे, अजय कांबळे, नितीन ओव्हाळ, रियाज दिना मेंबर, बाळासाहेब बनसोडे, दीपक गवळी, सागर उबाळे, अक्षय मस्के, अमोल कदम, भीमा मस्के, रवी बनसोडे, जयराज सांगे, सुहास म्हात्रे, किरण माने, स्वप्निल चौरे, विनोद सावंत, सिद्धार्थ सोनवणे, सोनू दुपारगोडे, अनिल राठोड, नारायण बंडगर, बापू मस्के, प्रेम बनसोडे, जगन्नाथ गायकवाड, विकी मेंदापूरे तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment