विमानसेवेसाठी प्रतीकात्मक विमाने उडवून आंदोलन - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, March 26, 2025

विमानसेवेसाठी प्रतीकात्मक विमाने उडवून आंदोलन





सोलापूर - अनेक दिवसापासून बंद असलेली सोलापूरची विमान सेवा  सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेड च्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सायंकाळी होडगी रोड वरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमाने उडवून सरकारची व लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध  केला सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळी आंदोलने करण्यात आली होती तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणे लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही.





 विमान सेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे सोलापूर वाशीय विमानसेवा सुरू केव्हा होईल याकडे आशा ठेवून आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले.





 यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास जयश्री जाधव शहराध्यक्ष शिरीष जगदाळे संपर्कप्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम स्वबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप निंबाळकर विरेश कंटीकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर आधी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot