जिजाऊ रथयात्रेचे जोरदार स्वागत, बहुजन समाजाला एकत्र करणे हाच उद्देश - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, March 26, 2025

जिजाऊ रथयात्रेचे जोरदार स्वागत, बहुजन समाजाला एकत्र करणे हाच उद्देश





सोलापूर - रा ज्यभर जिजाऊ  रथ यात्रेच्या माध्यमातून आपण दुरावत चाललेला बहुजन समाज एकत्र करण्याकरिता कार्य करत आहोत. मराठ्यासह बहुजनामधील तरुण दंगलीकडे न वळता तो स्वतःच्या उद्योगाकडे वळला पाहिजे हा मराठा सेवा संघाचा मूळ उद्देश आहे त्या उद्देशापासून आत्ताचा तरुण वर्ग दुरावत चालल्यामुळे ही रथयात्रा काढण्यात आली असल्याचे मत मराठा सेवा संघाचे सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केले.





जिजाऊ रथयात्रा 2025 मराठा जोडो अभियान, या निमित्ताने चार पुतळा येथेआयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.





यावेळी बोलताना अर्जुन तनपुरे म्हणाले की, आम्ही जी काही रथयात्रा काढली ती कुठल्या निवडणुका आमच्या डोळ्यासमोर नाहीत. निवडणुका असल्याचा काही कारण नाही. ही रथयात्रा यासाठीच काढली की मराठा सेवा संघ  मधल्या काळामध्ये म्हणजे मराठा सेवा संघच नाहीत तर ज्या काही बहुजन समाजाच्या संघटना आहेत त्या संघटनेमध्ये थोडी शिथिलता आलेली आहे. त्यामुळे शत्रू प्रबळ होत आहे. आणि म्हणून मागच्या दोन वर्षांमध्ये विविध प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभे राहत आहेत.  बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी, असे विविध प्रश्न निर्माण करून कुणाची हत्या झाली तर त्याच्यावर  जातीय तेड निर्माण करून समाजामध्ये भांडण लावून दंगल परिस्थिती निर्माण करणे हा हेतू ठेवून जे काही मूळ प्रश्न आहेत त्याला बदल देऊन या समाजामध्ये कशी धुई निर्माण याचा प्रयत्न मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये तर जास्त प्रमाणावर सुरू आहे .





कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के देशमुख यांनी केले.






उत्तमराव माने - शेंडगे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे , किरण घाडगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खराटे,काँग्रेसचे विनोद भोसले, गणेश डोंगरे, सचिन गुंड, पांडुरंग सुरवसे, राजन जाधव, माऊली पवार, गणेश देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के देशमुख ,सूर्यकांत पाटील, अतुल  धुमाळ, सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे ,प्रशांत पाटील सदाशिव पवार, हनुमंत पवार, दत्तात्रेय मुळे, विजय पोखरकर ,संजय जाधव, उज्वला साळुंखे, मनीषा नलावडे, लता ढेरे, लता फुटाणे, अभिंजली जाधव, स्मिता ताटे, लक्ष्मी माने स्वाती पवार,निर्मला शेळवणे, अश्विनी भोसले, गणेश माळी,यांच्यासह मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, हिंदू रक्षक लेझीम संघ, वारकरी  मंडळ कामती याच्यासह  नागरिक उपस्थित होते.




यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.





कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली जाधव यांनी केले.सदाशिव पवार यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot